कोरेगाव भीमा येथे महिला व तरुणाची आत्महत्या

कोरेगाव भीमा, ता. 30 ऑक्टोबर 2018 : येथील गणेशनगरमध्ये एक महिला व तरुणाने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उषा अनिल राठोड (वय 32) व अजय रमेश राठोड (वय 25, दोघेही रा. गणेशनगर, कोरेगाव भीमा, ता. शिरूर), अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील गणेशनगरमध्ये अनिल राठोड हे पत्नी व मुलांसह राहतात. रविवारी (ता. 28) रात्री आठ वाजले तरी पत्नी उषा या घरी न आल्याने त्यांनी नातेवाइकांकडे शोध सुरू केला. दरम्यान जवळच असलेल्या अजय रमेश राठोड याच्या खोलीत एका स्त्रीसह  अजय राठोड याने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. अनिल राठोड यांनी तेथे जाऊन खात्री केली असता, त्या ठिकाणी अजय राठोड याने अनिल राठोड याच्या पत्नीच्या साडीने घरातील छताला गळफास घेतल्याचे दिसले; तर बाजूला अनिल राठोड याची पत्नी उषा राठोड ही मृतावस्थेत जमिनीवर पडलेली दिसली. त्यानंतर अनिल राठोड यांनी याबाबातची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह उत्तर तपासणीसाठी नेण्यात आले. अनिल शिवराम राठोड यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमागची पार्श्‍वभूमी तपासण्यासाठी शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे अधिक तपास करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या