शिरुर पोलीसांकडून चोरलेला ड्रोन कॅमेरा जप्त

शिरुर, ता.३० अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांकडून दोन लाखांच्या चोरीचा गुन्हा उघडकिस आणण्यात यश आले आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलकेमळा (ता. शिरुर) येथे राहणारे संदिप गायकवाड यांचा दोन लाख रुपये किंमतीचा ड्रोन कॅमेरा प्रतिक हॉटेल समोरुन चोरी गेलेला होता. याबाबत शिरुर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दाखल गुन्हयाचा तपास शिरुर पोलीसांनी करत असताना तांञिक माहिती व गोपनीय माहिती गोळा केली. यावेळी मिळालेल्या माहितीत संशयित विश्वजीत किशोर चव्हाण यास ताब्यात घेतले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, आरोपीने गुन्हयाची कबुली दिली. पोलीसांनी चोरलेला ड्रोन कॅमेरा जप्त केला. या कारवाईत शिरुर पोलीस स्टेशनचे उमेश भगत, श्रावण गुपचे गणेश आगलावे, उमेश जायपञे, करणसिंग जारवाल यांनी सहभाग घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या