शेतमालाला रास्त भाव मिळेपर्यंत लढा सुरुच ठेवणार

Image may contain: 2 people, people standingनिमोणे,ता.३० अॉक्टोबर २०१८(प्रतिनीधी) : महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व दुधासह सर्व शेतमालाला योग्य हमीभाव मिळेपर्यंत आपला लढा चालुच राहिल असे प्रतिपादन शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा उसदर नियामक मंडळाचे सदस्य विठ्ठलराव पवार यांनी केले.

निमोणे (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.यावेळी पुढे बोलताना पवार म्हणाले की, "शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. हे सर्व शासनाचे पाप आहे, त्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या करू नये. उलट शासनाला याचा जाब विचारण्याची हिंमत आपण ठेवली पाहीजे. यावर्षी तर महाराष्ट्रात सर्वत्र तिव्र दुष्काळ पसरला आहे. अशा वेळी विजबिल, कर्ज यांसाठी कोणी वितरण कंपनी वा बँकांचे आधिकारी वसुलीसाठी दारात आले तर त्यांना योग्य भाषेत उत्तर द्या असेही ते म्हणाले.

याशिवाय सन्२०१८-१९या साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी सर्व सहकारी साखर कारखान्यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे पहिला विना कपात हप्ता - २७५०रू. मिळावा. त्यासाठी साखर विक्रीचा बेस रेट २९रु. ऐवजी ३३.५ ० रु. ठेवण्यात यावा.जे कारखाने याप्रमाणे उसाला दर देणार नाहीत, त्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने  मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठलराव पवार यांचे सह प्रदेश सचिव नंदाताई पवार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे, जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास काळे, हवेली तालुकाध्यक्ष हनुमंत गव्हाणे, शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे, महिला आघाडी अध्यक्षा दिक्षाताई जेऊघाले, निमोणे शाखाध्यक्ष मच्छिंद्र बांदल, तळेगांव शाखाध्यक्ष प्रविण जगताप, चिंचणी शाखाध्यक्ष युवराज पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोषराव काळे, प्रकाश दुर्गे, सुरेश काळे, संभाजी काळे, केरभाऊ दुर्गे,गणेश पोपळघट,मयुर ओस्तवाल,यांसह शेतकरी वर्ग उपस्थित होता. संतोषराव काळे यांनी सुत्रसंचालन केले.नवनाथ गव्हाणे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या