बचतगटाच्या महिलांना कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण

Image may contain: 15 people, people smiling, people standing and indoorतांदळी, ता. ३१ ऑक्टोबर २०१८ (प्रतिनीधी) : तांदळी(ता.शिरुर) येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने बचतगटातील महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले यांनी दिली.

तांदळी(ता.शिरुर) येथे नुकतेच कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर पार पडले.या शिबिरात परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.अशाच प्रकारचे प्रशिक्षण शिरुर तालुक्यात अनेक महिलांना देण्यात येत असुन या माध्यमातुन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय सेंद्रिय खते, गांडुळखते, एलईडी माळ तयार करणे,पणत्या बनविणे,दिवाळी पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी पं.स.सदस्य राजेंद्र गदादे, दत्ताञय गदादे, विभागीय अधिकारी टेमगिरे, जिल्हा बॅंकेचे अधिकारी रमेश बांडे, तृप्ती कांबळे, बापु धेंडे, बचत गटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या