रस्त्यांवरील खड्यांमुळे ऊसाने भरलेला ट्रक उलटला

Image may contain: sky and outdoorतळेगाव ढमढेरे, ता. 1 नोव्हेबर 2018 (एन.बी. मुल्ला) : धानोरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ऊसाने गच्च भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

शिरूर तालुक्यातील धानोरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यावर बुधवारी (ता. ३१) ऊसाने गच्च भरलेला ट्रक रस्त्यावर पडलेले खड्डे आणि खचलेले रस्ते यामुळे वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटून ट्रक उलटला. यामध्ये वाहनचालक किरकोळ जखमी झाला. यावेळी मदतीसाठी सुधाकर ढमढेरे, पप्पू जेधे तसेच येथील नागरिकांनी धाव घेतली व ट्रॅक्टरच्या सहाय्याने ट्रक बाजूला केला. घटना घडताच येथील नागरिक मदतीला धावून आले यामध्ये योगेश ढमढेरे, आदिनाथ ढमढेरे, शिरीष ढमढेरे, छगन ढमढेरे, पप्पू जेधे आणि किरण नरके यांनी मदत केली. ऊस वाहतूक करताना एका कारखान्याचे अंतर २० किलोमीटर पासून ५०-६० किलोमीटर अंतराचा टप्पा वाहनचालकांना मोठ्या कसरतीने पार करावा लागतो. चालूवर्षी मोळी पूजन झाल्यापासून घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, व्यंकटेश साखर कारखाना, पराग कारखाना हे खाजगी कारखाने चालूवर्षी ऊस गाळपासाठी ऊस वाहतूक जोरात चालू आहे. मात्र, येथील रस्ते खराब झाल्याने वाहन चालकांचे गाडीवरचे नियंत्रण सुटून असे अपघात घडले जातात.

वीजेच्या तारा लोंबकळतात रस्त्यावर...
तळेगाव ढमढेरे-धानोरे रस्त्यावरील मोहनमळा येथील नागरिकांनी विजवितरण विभागाच्या तारा रस्तावरून लोंबकळत असलेल्या तक्रारी अनेकदा करूनही यावर कार्यवाही होत नाही आणि तारा हुकवण्याच्या प्रयत्नात उसाच्या गाड्या उलटतात आणि रोज येथे वाहनचालक गाडी थांबवून तारा बाजूला करत असल्याचे नागरिकानी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या