गावांमध्ये पहाटे ऐकायला मिळतात काकड आरतीचे सूर...

Image may contain: 3 people, people standing and people sitting
शिरूर, ता. 16 नोव्हेंबर 2018: शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये पहाटेच्या वातावरणात 'रूप पाहता लोचनी ! सुख झाले ओ साजणी... काकड आरतीचे सूर ऐकायला मिळत असून, सकाळची भक्तिमय वातावरणात येथील भाविक मंत्र्मुग्न होऊन न्हाऊन जातात.

'रूप पाहता लोचनी ! सुख झाले ओ साजणी ! तो हा विठ्ठल बरवा ! बहुता सुकृताची जोडी ! म्हणोनी विठ्ठली आवडी ! सर्व सुखाचे आगर ! बाप रखुमा देवीवर !' अशा शब्दात सकाळची भक्तिमय वातावरणात येथील भाविक मंत्र्मुग्न होऊन न्हाऊन जातात. काकड आरती, गौळणी,  भजन, कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम उत्साहात पार पाडतात. पंचक्रोशीतून भाविक सढळ हाताने मदत करतात, काहीजण अन्नदान करून या कार्यक्रमास मोठे योगदान देतात.

काकड म्हणजे कुडकुडती थंडी, पावसाळा संपत आल्याचे व हिवाळ्याची चाहूल लागून कोजागिरी पौर्णिमेनंतर पहिल्या एकादशीला काकड आरती सुरु होते. या उपक्रमात सर्वजन भक्तिभावाने उत्स्फूर्तपणे स्पिकर लावणे, गंद लावणे, हार बनवणे, फुले आणणे, रांगोळी काढणे, देवाला स्नान घालून देवाची पूजा करणे हि सर्व कामे अगदी चोखपणे पार पाडत आहेत. दिवसेंदिवस काकड आरतीसाठी परिसरातील भाविक भक्तांची गर्दी वाढताना दिसत आहे.

तळेगाव ढमढेरे-न्हावरा रस्त्यालगत गणपती माळ येथील गणेश मंदिरात काकड आरती व अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून भाविकांची पहाटेपासून काकड आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. पूर्वी याच ठिकाणी फक्त गणपतीची मूर्ती होती परंतु येथील स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन भव्य मंदिर बांधले आहे. गणेश मंदिरात परिसरातून भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते या कार्यक्रमासाठी अबाल-वृद्ध भाविक भक्त हजर असतात. या परिसरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असून संत परंपरेची विचारधारा समाजात रुजली आहे. गेल्या आठ वर्षापासून अखंड हरीनाम सप्ताह व काकड आरती उपक्रम सुरू असून  या काकड आरतीला चार गावांच्या शिवेवरील तळेगाव ढमढेरे, टाकळी भिमा, कासारी, निमगाव म्हाळुंगी या गावामधून भाविक नित्याने हजर राहतात.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या