श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे भजनी मंडळांना साहित्य वाटप

विठ्ठलवाडी, ता. 21 नोव्हेंबर 2018: श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथे भजनी मंडळांना जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल यांच्या जि. प. निधीतून साहित्य वाटप करण्यात आले.

श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे आयोजीत कार्यक्रमात मंगळवारी (ता. 20) विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढरे, रांजणगाव सांडस आदी गावातील भजनी मंडळांना साहित्याचे वाटप जि. प. सदस्या रेखाताई बांदल व रा.स्व. संघाचे विभाग संघचालक संभाजीआप्पा गवारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना बांदल यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे मुलींचा सन्मान म्हणून प्रत्येक घराच्या दरवाज्यावर त्या कुटुंबातील मुलीच्या नावाची नेमप्लेट लावली त्याच धर्तीवर 'माझ्या अंगणी माझ्या लेकीचे झाड' हा उपक्रम राबविणार आहे. मुलींच्या आठवणीसाठी प्रत्येक घरासमोर एक आंब्याचे झाड लावण्याचा संकल्प करणार आहे. संभाजीआप्पा गवारे, दिलीप गवारे, बाबाजी गवारे, नवनाथ गवारे, ललिता गवारे आदींचीही भाषणे झाली.

यावेळी सरपंच, अलका राऊत, काळुराम गवारे, किसन गवारे, कौशल्या हंबीर, राजेंद्र शिंदे, तानाजी मारणे, बाबु ढमढेरे, सुजाता शेलार, मनीषा गवारे, रामदास गवारे, कृषी सहाय्यक प्रफुल कामठे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनंदन गवारे यांनी केले तर संदीप गवारे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या