ट्रॅन्टर इंडिया कंपनीने एकाचवेळी 17 कामगारांना काढले

Image may contain: one or more people and people standingडिंग्रजवाडी, ता. 7 डिसेंबर 2018 : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) हद्दीतील ट्रॅन्टर इंडिया या कारखान्यातील 17 कामगारांना एकाच वेळी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विनानोटीस कामावरून कमी केल्याच्या घटनेचा विविध कामगार संघटना व नेत्यांनी निषेध केला.

कंपनीने एकाच वेळी व कोणतीही पुर्व सुचना न देता 17 कामगारांना कामावरून काढून टाकल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. याविरोधात संघटनांनी एकत्र येत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला असून, संबंधित कामगार सध्या प्रवेशद्वारावर बसून आहेत.

राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनतर्फे आबाराजे मांढरे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती माजी उपसभापती मोनिका हरगुडे यांनी कामगारांची भेट घेऊन कामगारांना पाठिंबा व्यक्त केला. कामगारांसाठी सर्व संघटना एकत्र येऊन लढा उभारणार असल्याचे या वेळी आबाराजे मांढरे, ट्रॅन्टर इंडिया कामगार संघटनेचे राजेंद्र दरेकर, राजेंद्र बेंद्रे, ज्ञानेश्वर भुजबळ, नवनाथ हरगुडे; तसेच राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले; तसेच कार्याध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, दत्ताजीराव येळवंडे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत व्यवस्थापनाशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या