शिरूर तालुक्‍यातील रेशनिंग दुकानांच्या चौकशीची मागणी

शिरूर, ता. 8 डिसेंबर 2018: शिरूर शहर व तालुक्‍यातील विविध गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानातील (रेशनिंग) धान्याचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असून, रेशन दुकानदारांच्या अरेरावीला सामान्य ग्राहकाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सरकारी स्तरावर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी, तहसीलदार रणजित भोसले यांना याबाबतचे निवेदन दिले. मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्नील माळवे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, विकास साबळे, रवींद्र गुळादे, डॉ. वैशाली साखरे, तारूअक्का पठारे, श्‍याम पवार, शैलेश जाधव, गणेश जगताप या वेळी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, 'स्वस्त धान्य दुकानांच्या वेळा निश्‍चित नसल्याने धान्य घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना विनाकारण पायपीट करावी लागते. यात वेळेचा अपव्यय होऊन मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातही स्वस्त धान्य दुकान उघडे असल्यास दुकानदाराकडून अरेरावी सहन करावी लागते. त्यामुळे सामान्य ग्राहकांची व विशेषतः महिलांची अडचण होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व तालुक्‍याच्या विविध भागांत केलेल्या पाहणीत, अनेक ठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानांवर फलक नसल्याचे व अनेक दुकानांचे वेळापत्रक कोलमडून पडले असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शासनस्तरावर गांभीर्याने दखल घेतली जावी.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या