निमोणेत बुधवारी शेतकरी परिषदेचे आयोजन

निमोणे, ता.१० डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुधवार(दि.१२) रोजी शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पञकार परिषदेत दिली.

याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले कि, निमोणे येथे शेतकरी परिषद होणार असुन या परिषदेस माजी कृषी व महसुल मंञी एकनाथ खडसे हे उपस्थित राहणार आहे.या परिषदेत शेतकरी आत्महत्या होउ नये याबाबत प्रबोधन करण्यात येणार असुन विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर शेतक-यांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे.या परिषदेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पवार यांनी केले. या पञकार परिषदेस शिरुर तालुकाध्यक्ष नवनाथ गव्हाणे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या