विठ्ठलवाडीत गरजू शालेय मुलींना सायकल वाटप

Image may contain: one or more people and outdoor
विठ्ठलवाडी, ता. 23 डिसेंबर 2018: विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे गरजू मुलींना जिल्हा परिषद निधीतून ११ सायकलींचे वाटप तसेच हरिता कंपनीच्या सीएसआर फंडातून व मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेला ई लर्निंग संच भेट देण्यात आले. त्याचबरोबर मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सी एस आर फंडातून पांडुरंग विद्यालयाला भव्य क्रीडांगण बनवून देणार असल्याचे यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल यांनी सांगितले. यावेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा बँकेचे संचालक निवृत्तीआण्णा गवारे, सरपंच, उपसरपंच, संभाजी गवारे, शरद लोखंडे, प्रमोद फुलसुंदर, मनोज शितोळे, बाबाजी गवारे, दिलीप गवारे, मुख्याध्यापक सुरेश थोरात, विद्या सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनंदन गवारे व संगीता गवारे यांनी केले.

कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांडुरंग विद्या मंदिर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यासाठी बकेट ठेवण्यात येणार आहेत. या बकेट मध्ये ओला कचरा टाकल्यानंतर ४० दिवसात या ओल्या कचऱ्याचे विघटन होऊन त्याचे सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होणार आहे व हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना अल्प दरात देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कचरा इतस्तः न टाकता या बकेटमध्ये टाकावा. शिरूर तालुक्यात असा प्रकल्प करणारी विठ्ठलवाडी ही पहिली ग्रामपंचायत आहे.
- दादासाहेब नाथ, ग्रामसेवक विठ्ठलवाडी

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या