'नागरिकांच्या खात्यात 15 लाख टाकण्याचे खोटे आश्वासन'

Image may contain: 11 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 19 डिसेंबर 2018: येथे आठवडे बाजारात सोमवारी (ता. 17) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियान पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष महेश ढमढेरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले.

काँग्रेसने बाजारातील सर्व ग्राहक व विक्रेत्यांशी संपर्क साधून काँग्रेसने यापूर्वी राबवलेल्या योजना सांगितल्या तर सध्याच्या मोदी व फडणवीस या कुचकामी सरकारने लोकांचा केलेला विश्वासघात व घोर निराशा याचा पाढा वाचला व त्यासंबंधीची परिपत्रके ही वाटली. याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे पुणे जिल्हा खजिनदार महेश ढमढेरे म्हणाले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने विश्वासघातकी, भ्रष्ट, जुलमी व फसव्या सरकारच्या विरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने निवडणुकीत फक्त आश्वासनांची  बरसात केली. परंतु, या सरकारने दिलेल्या कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केलेली नाही त्यामुळे हे जनसंपर्क अभियान राबवून भाजपा-शिवसेना सरकारच्या फसव्या धोरणांचा व भ्रष्ट नीतीचा बुरखा फेडण्यासाठी सरकार विरोधात काँग्रेसने हे जनसंपर्क अभियान सुरू केले आहे.

यावेळी बाजारातील अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना भाजप सरकार मुळे महागाई वाढली असून, शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही त्यामुळे शेतकरी विरोधी सरकार आहे, तसेच सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचे खोटे आश्वासन देऊन या सरकारने लोकांची फसवणूक व घोर निराशा केल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, उपाध्यक्ष सचिन पंडित, व्हीजेएनटी कार्याध्यक्ष विशाल अवचिते, उपाध्यक्ष मनोज दंडवते, माऊली आल्हाट, सागर कांबळे, कार्तिक कुंभकर्ण, तुकाराम शिंदे, मनोज आल्हाट, रोहित शेलार, लिंबाजी साठे, विशाल थोरात, सोमनाथ शिर्के, सतीश कुंभार, रवि लोखंडे, चेतन हिमगिरे, अजय झेंडे, प्रशांत शिंदे, संदीप शेलार, मंगेश लोखंडे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या