लोकसभेसाठी कॉंग्रेसचा सक्षम उमेदवार देउ- संजय जगताप

शिरुर,ता.२४ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : लोकसभेच्या जागेसाठी प्रसंगी सक्षम उमेदवार देउ तर विधानसभेच्या सर्व जागा लढवण्यासाठी कॉंग्रेसची पुर्ण तयारी असल्याची माहिती कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी पञकार परिषदेत दिली.

शिरुर येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना एकदिवसीय संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात सन २०१४ मध्ये औद्योगिक,रोजगार,आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या भारताची आज २०१८ साली बेरोजगारी,इंधनदर,शेतकरी व महागाई यांच्या बाबत अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन याला सर्वस्वी केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप जगताप यांनी पञकार परिषदेत केला.

ढे बोलताना ते म्हणाले कि,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार पुणे जिल्हयातील सर्व विभागात कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.कॉंग्रेस पक्षाची विचारधारा,स्वातंञ्यपुर्व काळातील पक्षाचा इतिहास व कॉंग्रेसच्या सर्व पंतप्रधानांनी केलेला समतोल विकास योग्य व सक्षम पर्याय का आहे ही माहिती सर्वसामान्य कार्यकर्त्यांना व्हावी म्हणुन या माध्यमातुन प्रयत्न केला जात आहे.आघाडी सरकारच्या काळात भारत देश हा औद्योगिकदृष्ट्या व रोजगारीमध्ये किती सक्षम होता या गोष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचवावी हे प्रमुख उद्दिष्ट आहे.शिरुर लोकसभा व शिरुर-हवेली विधानसभेच्या बाबत बोलताना ते म्हणाले कि,शिरुर लोकसभेसाठी कॉंग्रेस सक्षम पर्याय उभा करु शकतो.

शिरुर विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिक कॉंग्रेससोबत आहे.शिरुर लोकसभेच्या सलग झालेल्या निवडणुकित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असुन त्यामुळे कॉंग्रेस पक्ष हि जागा लढवुहि शकते अन जिंकुही शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.वरिष्ठ पातळीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या प्रमुख नेत्यांमध्ये बोलणी चालु असुन बोलणी झाल्यानंतर योग्य ते निर्णय घेतले जातील माञ कॉंग्रेस पक्षाने पुणे जिल्ह्याच्या विधानसभेच्या सर्व जागांसाठी तयारी केली असुन उमेदवारांची चाचपणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण शिबीराला कॉंग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या