अंगारकी चतुर्थीनिमित्त महागणपतीच्या दर्शनाला गर्दी

No automatic alt text available.रांजणगाव गणपती, ता.२६ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : अंगारकी चतुर्थीनिमित्त रांजणगाव गणपती (ता.शिरूर)येथे अष्टविनायक महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

पहाटे महागणपतीच्या मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. रांजणगाव पोलिस स्टेशनकडुन पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मंदिर परिसरात तैनात करण्यात आले होते. प्रगतशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मुख्य गाभाऱा व मंदिर परिसरातआकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

ट्रस्टतर्फे महागणपतीच्या मूर्तीला आकर्षक पोशाख व सुवर्णालंकर परिधान करण्यात आला होता.बाभूळसर येथील गणेशभक्त मच्छिंद्र सुपेकर यांच्यातर्फे मंदिरातील सर्व भाविकांना खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले. आजच्या अंगारकी चतुर्थीसाठी परिसरातील हजारो भाविकांनी पायीवारी करून महागणपतीचे दर्शन घेतले. नव वधू-वरांची गणपतीच्या दर्शनाला विशेष उपस्थिती जाणवली. सकाळी महागणपतीची सामुहिक आरती झाली.दिवसभर साखळी पद्धतीच्या रांगेत महागणपतीच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला.

अंगारकी चतुर्थीनिमित्त व नाताळ सुट्टीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.मंदिर परिसरातील दुकाने गर्दीने फूलून गेली होती. दिवसभरात अनेक मान्यवरांनी महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या