रांजणगावला गांजा विक्री करणा-यांना शिताफीने अटक

No automatic alt text available.शिरुर, ता.२६ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : रांजणगाव औद्योगिक वसाहतीत गांजा विक्री करणा-या टोळीला रांजणगाव पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक करुन गांजा जप्त केला आहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रांजणगाव औद्योगिक वसाहतीत गांजा विक्री करण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची  गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार रांजणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस नाईक विनायक मोहिते, प्रफुल्ल भगत, चंद्रकांत काळे, मंगेश थिगळे, अमोल नलगे, माणिक काळकुटे, उद्धव भालेराव, उमेश कुतवळ यांच्या तपास पथकाने सापळा रचला होता.

त्यानुसार यश इन चौकात संशयास्पद दिसणा-या दोन मोटारसायकल वर आलेल्या इसमांचा पाठलाग करुन ताब्यात घेउन चौकशी केली असता मिळालेल्या बॉक्स मध्ये दोन किलो गांजा व साधने असा एकूण ७० हजार रुपये  किंमतीचा माल जप्त केला आहे. या प्रकरणी मुकेश अशोक गिरे, विजय तान्हाजी गव्हाणे, संदिप अशोक गिरे, पंकज भटू पाटील या आरोपींवर गुन्हा नोंद केला असून, शिरुर न्यायालयात हजर केले असता (दि.२७) पर्यंत न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या