सरदवाडीला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

Image may contain: 8 people, crowd and outdoorशिरुर, ता.२७ डिसेंबर २०१८ (प्रतिनीधी) : सरदवाडी (ता.शिरुर) येथे अखंड हरिनामाची सप्ताहाची नुकतीच सांगता झाली. या सप्ताहास राज्यभरातील किर्तनकारांनी उपस्थिती लावली असल्याची माहिती सरदवाडीचे सरपंच विलास कर्डिले यांनी दिली.

सरदवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजनाचे हे ३७ वे वर्ष होते.सात दिवस विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रादायातील भजन सम्राज्ञी गोदावरी मुंडे यांचा अभंग व गवळणी गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर श्री क्षेञ महादेवगड माणिकदोंडी, ता.पाथर्डी येथील आदिनाथ आंधळे, पिंपळनेर (ता. पाटोदा) येथील परमेश्वर जायभाय, अकोले येथील दिपक देशमुख, आळंदीचे विष्णु केंद्रे, वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष संतदास मनसुख, भाउसाहेब गट, गाथा मंदिर देहुगाव चे अध्यक्ष पांडुरंग घुले महाराजांची किर्तन सेवा झाली.

या सप्ताहात अखंड विना नामस्मरण, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायन, गाथा भजन, हरिपाठ, हरिजागर हे धार्मिक कार्यक्रम पार पडली. ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात आले तर संदिप सरोदे यांनी निवेदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या