विठ्ठलवाडीला राष्ट्रीय गणित दिन साजरा

Image may contain: 4 people, people smiling, people standingविठ्ठलवाडी, ता.२७ डिसेंबर २०१८(प्रतिनीधी) : विठ्ठलवाडी येथील पांडुरंग विदया मंदिरात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात थोर गणिततज्ञ  श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी इ.५ वी ते ७ वी च्या विदयार्थ्यांनी बनविलेल्या पोस्टरचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

यात तब्बल १२० पोस्टरची मांडणी केली होती. त्यानंतर दोन गटात प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. गणित शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी संस्कृती गवारे, माजी उपसरपंच बाबाजी गवारे, दिलिप गवारे, मुख्याध्यापक सुरेश थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी किसन गवारे, परशुराम गवारे, रघुनाथ गवारे, संदिप गवारे, भाऊसाहेब वाघ, अरूण शिंदे, विशाल कुंभार, बाळासो गायकवाड, प्रविण जगताप, संगीता गवारे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या