इनामगावला विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

Image may contain: 6 people, people standing, tree, wedding, crowd and outdoorइनामगाव, ता.९ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव फराटे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि लोकनेते दादापाटील फराटे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने इनामगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उत्साहात उदघाटन करण्यात आले.

पाच दिवस चालणा-या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी अर्जुन मचाले, श्रीनिवास घाडगे,हमीद शेख, प्राचार्य सुभाष शिंदे,शीतल गांधले,घारे भाऊसाहेब, शहाजी घाडगे, ह.भ.प. दत्तात्रय लाटे महाराज, तुकाराम मचाले, सर्जेराव भालेराव, सखाराम भालेराव, संजय घाडगे,रुपेश घाडगे, हंबीर घाडगे, भरत म्हस्के, वसंतराव फराटे महाविद्यालयाचे संस्थापक राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव सौ. म्रूनाल फराटे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना सरपंच मंगलताई म्हस्के म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार शिबिराचे महत्व समजले पाहिजे. अशा श्रमसंस्कार शिबिरातुन विध्यार्थी व्यक्तिमत्व विकास होत असतो.तसेच सर्वांनी अशा शिबिरात सहभाग घेतला पाहिजे. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल पितळे यांनी या शिबिरामध्ये श्रमदानातून वुक्षारोपन, ग्रामस्वच्छता, वनराई बंधारे बांधणे, रक्तदान शिबिर तसेच विशेष व्याख्यानमाला कार्यक्रम करणार असल्याची माहिती दिली.
 
या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्राचार्य डॉ.तुकाराम सावंत, प्राचार्य डॉ.म्रूनाल शिरसाट, प्रा.संदीप कोकरे, प्रा.अविनाश ढोबळे, प्रा. जयराम पवार, प्रा. सुरेखा देशमुख, प्रा.सुप्रिया आटोळे, प्रा.अनिता नजन, प्रा.सागर खर्डे, या सर्वांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा.अमोल पितळे यांनी तर प्रास्ताविक प्रा. सुरेखा देशमुख यांनी केले तर आभार प्रा.विवेक सातपूते यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या