शिक्रापुरात भरला सोळा वर्षांनी दहावीचा वर्ग

Image may contain: 3 people, people smiling, people standingशिक्रापूर, ता.१० जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) : शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत तब्बल सोळा वर्षांनी दहावीचा वर्ग भरल्याने माजी विद्यार्थी मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.  

विद्याधाम प्रशालाचे माजी विद्यार्थी सुहास रुके, मनोज मचे, संजय राऊत, गणेश राऊत, अश्विनी भागवत, भाग्यश्री वाबळे, सचिन रुके, शेरखान शेख, तुषार काळे, निलेश राऊत, सचिन राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून नुकतेच माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वजण तब्बल सोळा वर्षांनी एकत्र आल्यामुळे अनेक जण एकमेकांना ओळखत देखील नव्हते तर प्रत्येकजण त्यांचे नाव सांगत असताना सर्वांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणीने हसू फुलत होते तर अनेक जणांना यावेळी भावना अनावर होत होत्या. यावेळी माजी विद्यार्थी अरे तो तूच का, अरे तू किती बदलला, तू किती बदलली, पहिला कसा दिसत होता आता कसा दिसतोस असे म्हणत सर्व माजी विद्यार्थी जुन्या आठवणीमध्ये रंगून गेले होते.

यावेळी शाळेतील त्यावेळचे शिक्षक बाबुराव साकोरे, रामदास शिंदे, बाबुराव कोकाटे, दिगंबर नाईक, सुनील दिवटे, सुरेश गंगावने, उमेश शिंदे, संभाजी सोनवणे, मंगल शिंदे, शुभांजली झांबेकर, विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य नरेंद्र व्यवहारे आदी उपस्थित होते. शिक्षकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला. आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहून मनोगत व्यक्त करताना शिक्षकांनाही भारावून आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय राऊत यांनी केले तर भाग्यश्री वाबळे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या