शिरुरच्या 'त्या' नगरसेवकाची अशीही सेवा

Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoorशिरुर, ता.१३ जानेवारी २०१९ (प्रतिनीधी) : कुडकुडणारी थंडी..काही तरुण माञ हातात झाडु, खराटे अन तोंडाला मास्क लावुन स्वच्छतेच्या कामात व्यस्त असतात. या कार्यात सर्वात पुढे असतात शिरुर नगरपरिषदेतील एक नगरसेवक.हे चिञ माञ दर रविवारी नक्की शिरुर शहरात शिरुरकरांना भल्या पहाटेपासुन पहायला मिळतं.

दर रविवारी न चुकता शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप गायकवाड हे भल्या पहाटे हातात खराटे, ग्लोव्हज अन मास्क घालुन सहका-यांना घेउन स्वच्छतेच्या कामात व्यस्त असतात. आज रविवारी (दि.१३) रोजी शिरुर येथील विद्याधाम प्रशाला,मंडल अधिकारी कार्यालय व परिसरात भल्या पहाटेच सहका-यांसह स्वच्छता केली.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि, पदाचा गर्व नसुन कोणतं ही काम असो त्यात लाज बाळगायची नसते. स्वच्छतेचे हे पविञ कार्य असते.परंतु अनेकजण स्टेटस अन लोक काय म्हणतील यामुळे लांब राहणे पसंत करतात. मी ही स्वच्छता मोहिम आजच नाही तर गेल्या अनेक  महिन्यांपासुन सातत्याने राबवत असुन या पुर्वी प्लॅस्टिक, तसेच इतरञ पसरलेली घाण स्वत: सहका-यांच्या मदतीने साफ करत आहे. या मध्ये अनेकांचा हातभार लागतो. हा संकल्प यापुढेही सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

स्वच्छतेबाबत शिरुर नगरपरिषदेचे नगरसेवक संदिप गायकवाड यांनी समाजासमोर वेगळाच आदर्श घालुन दिला आहे. पद असलं कि अनेकांना वेगळीच नशा चढलेली असते. परंतु, शिरुर नगरपरिषदेचे संदिप गायकवाड हे नगरसेवक याला अपवाद असुन त्यांनी स्वत: हाती घेतलेल्या अभिनव मोहिमेचे शिरुर शहरात कौतुक होत आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या