...अन् शिरुर शहरात अवतरल्या राजमाता जिजाऊ
शिरुर, ता.१४ जानेवारी २०१९(प्रतिनीधी) : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात महिला संघटनांच्या वतीने भव्य मिरवणुकिचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी या मिरवणुकीची सुरुवात शिरुर बाजारसमितीतील छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. त्यानंतर निघालेल्या वाजत-गाजत मिरवणुकित चिमुकले,आबालवृद्ध यांसह महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. जिजाऊ उद्यान येथे मिरवणुकिची सांगता झाली.
यावेळी विविध क्षेञात उल्लेखनीय कार्य करणा-या राजश्री भाकरे व शर्मिला निचित या महिलांना राजमाता जिजाऊ व साविञीबाई फुले पुरस्कार देउन गौरविण्यात आले. शकुराव कोरडे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी व्याख्यान दिले. दिपक घारु व अश्विनी घारु यांनी जिजाऊंच्या इतिहासावर एकांकिका सादर केली.
वारसा फाउंडेशन च्या प्राची दुधाने, मंजुश्री थोरात, शिल्पा बढे, अलका ढाकणे, वर्षा नारखेडे, आदिशक्तीच्या सुनंदा लंघे, शशिकला काळे, लता नाझिरकर, सुवर्णा सोनवणे, राणी कर्डिले, वैभवीच्या साधना शितोळे, गौरी घावटे, नंदा खैरे, सुषमा शितोळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले तर युवा स्पंदन च्या प्रियंका धोञे व मुलांनी लेझीम कला सादर केली.
यावेळी जि.प. सदस्य रेखाताई बांदल, पुजाताई प्रदिप कंद, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षा शोभना पाचंगे, विक्रांत थोरात, कृणाल काळे आदी उपस्थित होते.