मुलांच्या चेहऱ्यावर आनंद लागला ओसंडून वाहू (व्हिडिओ)

Image may contain: 25 people, people smiling, people standing
शिंदोडी, ता. 15 जानेवारी 2019 (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील राधाकृष्ण फूडलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर्फे CSR फंडातून शिंदोडी येथील अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे तसेच शैक्षणिक साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले.

शिंदोडी येथील अंगणवाडीत सुमारे ५७ विद्यार्थी असून, त्यामध्ये ३५ मुली आणि २२ मुले आहेत. गावातील वेगवेगळ्या भागातून हि मुले शाळेत येतात. राधाकृष्ण फुडलॅन्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रथम अंगणवाडी शाळेत येऊन प्रत्यक्ष पहाणी केली. त्यानंतर मुलांची गरज ओळखून मुलांना कपडे, चपला, खेळण्याचे साहीत्य, शैक्षणिक साहित्य तसेच मुलांना खाण्यासाठी विविध फळे आणली. त्यामुळे अंगणवाडीच्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी राधाकृष्ण फुडलॅन्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एचआर मॅनेजर अक्षय डोंगरे, मॅनेजर रमेश तिकुडवे, तनुज मोहापात्रा, सतीश शिंदे, राजीव कुमार, दिलीप औटी, जेष्ठ नागरीक भगवंत वाळुंज, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हिरामण शेलार, राजाराम जाधव, विकास वाखारे, राजाराम घोरपडे, मंगल घोरपडे, राजेंद्र साळुंखे, अंगणवाडी शिक्षिका शालन धावडे, मदतनीस सुशिला गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी ओव्हाळ, सदस्य प्रकाश शिंदे, रामकृष्ण गायकवाड यांच्यासह मान्यवर, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या