शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण?

Image may contain: 2 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 16 जानेवारी 2019: शिरूर लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळेल व खरा उमेदवार कोण असेल? यावर शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पवारसाहेबांनी सांगितले आणि पक्षाने आदेश दिला; तर शिरूर लोकसभेची निवडणूक लढवायची माझी तयारी आहे. मी निवडणूक लढविली तर निवडूनच येईल; नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही, असा घणाघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच केला. यावर www.shirurtaluka.com ने खालील मतचाचणी घेतली.
अजित पवार यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी, असे आपणास वाटते काय? या मतचाचणीवर 75 टक्के नागरिकांनी निवडणूक लढवावी तर 25 टक्के नेटिझन्सनी नको म्हटले आहे.
माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करत लोकसभेच्या प्रचाराची एकप्रकारे सुरुवात केली आहे. त्यांनी टाकलेल्या या डावाने माञ अनेक पेचात पडले असून राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. यावर www.shirurtaluka.com ने खालील मतचाचणी घेतली.
मंगलदास बांदल प्रचारास प्रारंभ करून शिरूर लोकसभा निवडणूकीत धांदल उडवून देतील, असे आपणास वाटते काय?
84 टक्के नेटिझन्सनी होय तर 16 टक्के नाही म्हणत आहे.

परंतु, शिरूर लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने अद्याप कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही. तत्पूर्वीच, अनेकजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. अजित पवार व मंगलदास बांदल यांनी आपण निवडणूक जिंकू म्हणून सांगत असले तरी या दोघांपैकी तुम्ही कोणाला पसंदी द्याल? आपले मत जरूर नोंदवा अथवा प्रतिक्रिया व्यक्त करा.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या