शिरूरमध्ये जय किसान कृषी प्रदर्शनाचे आयोजन

Image may contain: 31 people, people smilingशिरूर, ता. 23 जानेवारी 2019: शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर येथेल स्व. शहिदखान पठाण नगरी, रयत शाळा मैदानावर येथे २४ जानेवारी ते २८ जानेवारी २०१९ दरम्यान दुसरे जय किसान कृषी प्रदर्शन भरवण्यात आले आहे, अशी माहिती बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येकासाठी भेट द्या आकर्षक बक्षीस जिंका अशी योजना आहे. या पत्रकार परिषदेस बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बंडू जाधव, प्रविण चोरडिया, अॅड. वसंत कोरेकर, शंकर जांभळकर, संतोष मोरे, बाबासाहेब सासवडे, सचिव अनिल ढोकले, उपस्थित होते.

या कृषीप्रदर्शनात शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन बदल, त्यातील उत्पन्न वाढीचे झालेले बदल व त्याचे मार्गदर्शन व माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे. शेती क्षेत्रात झालेले नवनवीन बदल, नवीन कृषी अवजारे मशनरी, कृषी प्रक्रिया उद्योग ठिबक व तुषार शिंचन, आधुनिक किटकनाशके, रासायनिक व सेंद्रिय खते, डेअरी व फूड्स उद्योग, पशुसंवर्धन, पशूखाद्य, नवनवीन बी बियाणे, ट्रॅक्टर व वाहन उद्योग कृषी बेंकिंग, कृषी योजना, कृषी विषयक पुस्तक इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहपयोगी वस्तू, महिला बचत गट स्टॉल, शोभीवंत झाडांची रोपवाटिका, नवीन घरे बंगले, कृषी विषयक चर्चासत्र यांचा या कृषी प्रदर्शनात सहभाग व त्यांचे स्टॉल, ग्रहउपयोगी स्टॉल, विविध प्रकारचे खाद्य पदार्थ स्टॉल असणार असल्याचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जे नवीन बदल केले असतील अशा शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे. या कृषी प्रदर्शनाचे संयोजन तोडकर इव्हेंनटस मंचर हे करणार आहेत. या कृषीप्रदर्शनात असणारे स्टॉल बुकिंग साठी सचिन तोडकर ९६०४४३४४४४सचिव अनिल ढोकले 9921224490 यावर   संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनातून शेतकरी राजाने नवनवीन गोष्टींचे अनुकरण करावे हा यामागचा हेतू आहे. प्रदर्शन शिरूर एस टी स्टँड मागे स्व. शहीदखान पठाण नगरी, रयत शाळा मैदानावर 24 ते  28 जानेवारी 2019 रोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत विनामूल्य रहाणार असल्याचे सांगितले. दुष्काळ परिस्थिती असताना शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतीत आधुनिकता आणण्यासाठी व आधुनिक शेतीकडे शेतकरी वळावे, उत्पन्नात वाढ कशी करावी, शेतीतील स्पर्धेत येथील शेतकरी उतरावा हाच उद्देश या कृषी प्रदर्शनात असल्याचे बाजार समिती सभापती शशिकांत दसगुडे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या