जातेगावचे सुपुत्र शहाजी उमाप यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Image may contain: 1 person, sittingजातेगाव, ता. 26 जानेवारी 2019: जातेगाव बुद्रुकचे (ता. शिरूर) सुपुत्र व मुंबई पोलिस परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमाप यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याचे समजताच गावात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

कडक व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाप यांनी यापूर्वी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात सन 1996 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उपअधीक्षक पदनामावलीत राज्यात प्रथम आले होते. आंबाजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून आणि कोल्हापूर व नांदेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांचा कार्यकाल गाजला. नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत २०१२ मध्ये तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजारांहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली होती. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई येथेही त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले.

उमाप यांचे ज्येष्ठ बंधू कांतिलाल उमाप हे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त, दुसरे बंधू सुभाष उमाप हे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती, तिसरे बंधू ऍड. राजेंद्र उमाप हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष; तर चौथे बंधू कॅप्टन संभाजी उमाप हे पुणे येथे विक्रीकर उपायुक्त आहेत. उमाप हे कुटुंबीय शिक्रापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या