...त्यांनी जपली रुग्णसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी

Image may contain: 16 people, people smilingशिरुर,ता.२७ जानेवारी २०१९(प्रतिनीधी): समाजात मातृसेवा,पितृसेवा,रुग्णसेवा यांचबरोबर देशसेवेला अनन्यसाधारण महत्व आहे.म्हणुनच देशसेवेचं महत्व जाणुन घेत श्री गणेशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आगळया वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Image may contain: 2 people, people standing and outdoorदेशासाठी सिमेवर जीवाची बाजी लावणा-या सैनिकांचा हॉस्पिटलच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित केला होता.श्री गणेशा हॉस्पिटलचा तिरंगा ध्वज आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीत फडकावण्यात आला.यावेळी बंदुकीच्या हवेत फैरी झाडुन ध्वजास सलामी देण्यात आली.

या प्रसंगी उपस्थितांचे डॉ.अखिलेश राजुरकर यांनी स्वागत करत श्री गणेशा हॉस्पिटलने शिरुर येथे हॉस्पिटल उभारणीनंतर सैनिक व सैनिक कुटुंबांसाठी आजतागत सुमारे १४ लाख रुपये बील माफ करत या द्वारे सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम केले असुन सैनिकांसाठी यापुढेही हॉस्पिटलच्यावतीने यशाशक्ती मदत कायम सुरु ठेवणार असल्याचे डॉ.राजुरकर यांनी बोलताना सांगितले.

आजी माजी सैनिकांनी हॉस्पिटलचे सैनिकांप्रती व समाजाप्रती जपले जाणारे उत्तरदायित्व प्रशंसनीय असल्याचे सांगत हॉस्पिटलचे कौतुक करत डॉ.अखिलेश राजुरकर व डॉ.विशाल महाजन यांचे आभार मानले.यावेळी श्री गणेशा हॉस्पिटलच्या डॉ.ऋचा घोंगळे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ.सागर केदारे यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले.

हॉस्पिटलच्या वतीने दत्ताञय वाखारे, भुजंगराव कर्पे, बाळासो शेवाळे, ज्ञानदेव धावडे, भास्कर चव्हान, बी.एस.पवार, सुरेश जाधव, सोमनाथ सोनवणे, राजु हेलावडे, संजय कदम, गुलाबराव खरबस, निलेश सोनवणे, भाउसो सोनवणे, नंदकुमार सोनवणे, गहिनीनाथ डोंगरे, महादेव घावटे, नामदेव घावटे, भिमराव सोनवणे, शिवाजी औटी, बुवाजी खेडकर, गोरक्ष खेडकर, अनिल खेडकर, बंडु कोहोकडे, शिवाजी कोहोकडे, रंगनाथ नवले, सुभाष नवले, बबन फलके, शिवाजी फलके, प्रकाश कर्डिले, दशरथ गो-हे, शिवाजी कापरे, शिवाजी फलके, राजु गो-हे या सैनिकांचा सन्मानचिन्ह देउन विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज खरात, पंकज गायकवाड, ऋतुराज चव्हान, ऋषिकेश चव्हाण, प्रशांत नाईक, राजू नाईक यांसह हॉस्पिटलच्या स्टाफ ने विशेष परिश्रम घेतले.

पराग कोळपकर, पञकार मुकुंद ढोबळे, पुष्पराज कोळपकर, गणेश कोळपकर यांसह नागरिक उपस्थित होते. हॉस्पिटलला केलेली सजावट व काढलेली आकर्षक रांगोळी ही सकाळपासूनच सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या