सुरज मांढरेंचा शिरुरला पंचायतीसमोर निषेध

Image may contain: 17 people, including Sunil Sawant, people smiling, people standingशिरूर,ता.३० जानेवारी २०१९(प्रतिनिधी) : अत्याचाराचे निवेदन देण्यास गेलेल्या नागरिकांना अपमानास्पद वागणुक दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांचा पंचायत समितीच्या प्रवेशद्वारातच निषेध करण्यात आल्याचा प्रकार घडला.

सविस्तर असे कि,शिरूर शहरातील नाभिक संघटना तालुक्यातील नाभिक संघटना यांच्यावतीने ढेबेवाडी सातारा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर चे तहसीलदार यांना  निवेदन देण्यात येणार होते.यासाठी सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी शिरूर तहसीलदार कार्यालय येथे गेले होते.

तहसीलदार तेथे नसल्याने व कुठलाही प्रमुख अधिकारी तेथे नसल्याने निवेदन देण्यासाठी बराच वेळ लागला होता. शिरूर पंचायत समिती येथे एका बैठकीत असल्याचे समजल्यावर सर्व कार्यकर्ते तेथे गेले. तिथे गेल्यावर बैठकीत असणारे तहसीलदार यांना बोलावण्याची विनंती केली.त्यासाठी काही पत्रकार व संघटनेचे कार्यकर्ते आत गेले असता सूरज मांढरे यांनी पत्रकारांना तुम्हाला फोटो पाहिजे असेल असे बोलून अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर व्हा असे म्हणून त्याच्यासह बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांनाही बाहेर हाकलून दिले यांना बाजूला कडेला बसवा, बैठक संपल्यावर बघू असा आदेशाच त्यांनी दिला.

त्यांना महिला अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले तरी त्यांनी याबाबत कुठलीही गांभीर्य न घेता केलेले कृत्य नागरिकांना व पत्रकारांना अपमानास्पद वाटल्याने नाभिक संघटना व आलुतेदार संघटना यांच्यात  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात तू-तू मै-मै झाली,  तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तहसीलदार यांना जाऊ नका अशी तंबी दिली.शिरूरचे तहसीलदार रणजित  भोसले यांनी त्यांना विनंती करून निवेदन घेऊन पुन्हा परत येतो असे सांगितले व निवेदन घेतले.

महिलेवर अत्याचार होतो व त्याच्या निषेधार्थ निवेदन  देण्यासाठी आम्ही आलो होतो.आम्हाला अशी वागणूक देणे योग्य नाही,  याचा शिरूर तालुका व शहर नाभिक संघटना व शिरूर तालुका अलुतेदार-बलुतेदार संघटनेच्यावतीने शिरूर पंचायत समिती प्रवेशद्वारावरच काही वेळ धरणे धरून जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन निषेध केला. शिरूर  पत्रकारांच्या वतीने  निषेध करून या बाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या कडे तक्रारही केली. यामुळे शिरूर पंचायत समितीमध्ये वातावरण काही वेळ तणावग्रस्त झाले होते. शिरूर तालुका दुष्काळ टंचाई बैठकीला उपस्थित नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य आणि पत्रकारांना योग्य वागणूक देणे गरजेचे असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या