...पण वेळ आल्यावर माञ मला विसरु नका

Image may contain: 1 person, smiling, closeupवडगाव रासाई,ता.१ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : आजपर्यंत मी कधीच कोणाकडे काही मागितलं नसुन वेळ आल्यावर माञ मला विसरु नका अशी प्रेमळ भावनिक साद जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे ठिकठिकाणच्या सार्वजनिक कार्यक्रमात सर्वसामान्यांना घालत असुन सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये ही प्रदिप कंद यांचीच चर्चा चांगलीच सुरु झाली आहे.

शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील शिरुरच्या पुर्व भागात जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे सातत्याने छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहत असुन त्यांची उपस्थितीही सर्वसामान्यांचे लक्ष वेधुन घेत आहे.

"मी जिल्हा परिषदेत असताना कसलाही भेदभाव न करता, लहान मोठे अथवा पक्ष याचा विचार न करता सर्वसामान्यांची कामे केली आहे.शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावात भरघोस निधी दिला आहे.जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना शिरुर-हवेलीमधील छोट्या मोठ्या गावांमध्ये सुमारे पावणे चारशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे.यात गाव-वाड्यावस्त्यांचादेखिल विचार केला असुन तळागाळातील जनतेची सेवा करण्याचे भाग्य मला मिळाले.त्यामुळे आजपर्यंत मी कधीच कोणाला काही मागितले नाही परंतु वेळ आल्यावर माञ मला विसरु नका" अशी साद ते विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन नागरिकांना घालत आहे.

प्रदिप कंद हे समोरचा व्यक्ती कोणत्या पक्षाचा आहे याचा कधी भेदभाव करत नाही,त्यामुळे फेसबुक,व्हॉटस अप या सोशल मिडियाच्या माध्यमांमध्येही त्यांचे अनेक चाहतेही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले असल्याचे शिरुर तालुक्यात दिसुन येत आहे.त्यामुळे येणा-या विधानसभेच्या निवडणुकित शिरुर तालुक्यात नेत्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात वेगळेच स्थान निर्माण झाले असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या