करंदीत चोवीस वर्षानंतर झाली वर्गमित्रांची भेट

Image may contain: 3 people, people smiling, people standing and crowdकरंदी,ता.२ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : करंदीत दोन तपानंतर तीच शाळा, तोच वर्ग, तेच विद्यार्थी, तेच गुरूजन असा योग जुळुन आला होता. यावेळी भेटलेल्या वर्गमिञांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला.

करंदी येथील विद्या विकास मंदीर  या विद्यालयातील 1993-94 मधील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा नुकताच शाळेमध्ये पार पडला. दोन तपानंतर सर्वांनी शालेय जिवनातील आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कैलास ढमढेरे हे होते. 

संस्थेचे अध्यक्ष नरसिंग ढोकले, उपाध्यक्ष  पोपट नप्ते, सचिव वसंत ढोकले, सदस्य संतोष ढोकले, दादा श्रीपती ढोकले, पोपट शंकर नप्ते उपस्थित होते. सुनिल दळवी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. दिवगंत वर्गमित्र राजु लोखंडे व अलका मांदळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी सर्व गुरुजनांचा तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.शाळेच्या वाचनालयास विद्यार्थ्यांचे ज्ञानात भर पडणेसाठी माजी विद्यार्थ्यांकडुन पुस्तके भेट देण्यात आली. यानंतर प्रत्येकाने आपली ओळख करून देवुन शाळेशी असलेला ऋणानुबंध व कृतज्ञनतेची भावना व्यक्त केली. तात्याभाऊ ढोकले  यांनी सर्व 10 वी च्या मित्रांचे स्नेहमेळावा आयोजित करण्यासाठी प्रयत्न केले.प्रथमच भेटलेल्या वर्गमिञांनी एकमेकांची आवर्जुन विचारपुस केली.

शिरूर बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले, रामदास खेडकर, तात्यासाहेब ढोकले, भरत ढोकले, अविनाश ढोकले, प्रमिला घुले (नप्ते), संजीवनी दुधाडे (ढोकले) यांनी स्नेहमेळावा आयोजित करणेचे नियोजन केले. सदर कार्यक्रमास संतोष गलांडे, सुनिल ढोकले, सिकंदर ढोकले, बापुसाहेब ढोकले, अभिमन्यू वर्पे, संतोष ढोकले, संभाजी दौडकर,  सविता नप्ते, नंदा नप्ते, सविता पंचमुख, मनिषा  ढोकले, वैशाली दिघे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.तर त्यावेळचे दहावीचे क्लास शिक्षक गुडे, रासकर, बनसोडे, डाळींबकर, उकिर्डे हे उपस्थित होते. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कैलास ढमढेरे यांनी शाळेची विविध विकासकामे सुरू असुन माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी काहीतरी मदत करावी असे आवाहन केले. त्यास अनुसरून शाळेच्या ऋणामधुन थोडे का होईना मुक्त होणेसाठी अनिल ढोकले, तात्याभाऊ ढोकले, अविनाश ढोकले यांनी सर्व विद्यार्थ्याकडुन मदत जमा करून व त्यांचेकडुन जास्तीत जास्त भरीव अशी मदत शाळेस देत असलेचे जाहीर केले. संदीप खेडकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी तसेच शिक्षक, पदाधिकारी यांचे आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या