एनएमएमएस परिक्षेत विद्याधामच्या विद्यार्थ्यांचे यश

कान्हुर मेसाई,ता.२ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : नुकत्याच झालेल्या एन.एम.एम.एस. परिक्षेत कान्हूर मेसाई येथील विद्याधाम हायस्कूलचे १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असल्याची माहिती भास्कर पुंडे यांनी दिली.

नुकतीच एन.एम.एम.एस परिक्षा पार पडली.यात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे, उपाध्यक्ष तानाजी खर्डे, सचिव जी. के. पुंडे, उपसचिव राजेंद्र ननवरे, आनंदराव तळोले व ग्रामस्थांनी  अभिनंदन केले आहे.

यश मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :

शिंदे प्रसाद हनुमंत,सातपुते कावेरी कैलास, खैरे प्रतिक विलास, दळवी जयश्री रामदास, भंडलकर गौरी भरत, चौधरी श्रुती बाळासाहेब, आदक संकेत बबन, तळोले श्रद्धा बाबासाहेब, खर्डे शुभम शिवाजी, मांदळे प्रियंका केरभाऊ, जाधव भाग्यश्री रामदास, तांबोळी अलिया अशिब, नेटके साहील नितीन.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या