शिरुर पोलीसांनी दबंग कारवाई करत 'तो' टेंपो पकडला

शिरुर, ता.३ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी धाडसी पाठलाग करुन गुटख्याचा टेंपो पकडला माञ एफडीए च्या अधिका-यांना माञ याचे कोणतेही गांभीर्य नसल्याचा प्रकार उघडकिस आला आहे.

सविस्तर असे कि, शनिवार (दि.२) रोजी पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांना गोपनीय मिळालेल्या माहितीच्याआधारे शिरुर जवळ पुणे नगर महामार्गावर सतराकमानी पुलाजवळ सापळा रचुन धाडसाने पाठलाग करुन संशयास्पद रित्या जाणारा टेंपो ताब्यात घेतला.सदर टेंपोत पाहिले असता गुटख्याची पोती असल्याचे आढ़ळुन आले.त्यानंतर घोंगडे यांनी टेंपो व चालकास ताब्यात घेउन शिरुर पोलीस स्टेशन आवारात लावला. याविषयी घोंगडे यांना विचारले असता, सदर संशयास्पद टेंपो ताब्यात घेतला असुन त्या टेंपोत गुटखाच आहे. याबाबत एफडीए च्या अधिका-यांना कळविण्यात आले असुन संबंधित अधिकारी आल्यानंतर पंचनामा करण्यात येइल व त्यानंतरच नेमका किती गुटखा आहे हे समजु शकेल असे त्यांनी सांगितले.

शिरुर पोलीसांनी मोठ्या धाडसाने शनिवारी टेंपो पकडला माञ रविवारी संपुर्ण दिवसभर अन्न व सुरक्षा (एफडीए)च्या अधिका-यांनी एवढी मोठी कारवाईकडे दुर्लक्षच केले.सायंकाळपर्यंत कोणीही अधिकारी घटनास्थळी आलेच नव्हते.यावरुन एफडीएच्या अधिका-यांना मोठया कारवाईचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसुन येते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या