शिक्रापूर पोलीसांचा महासंचालकांच्या हस्ते गौरव

Image may contain: 6 people, people standingशिक्रापूर, ता.४ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, शिवशांत खोसे यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते प्रशंसापञ देत विशेष सन्मान करण्यात आला.

ऐतिहासिक कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमात आव्हानात्मक शिक्रापुर पोलीसांनी बंदोबस्ताची जबाबदारी अतिशय कौशल्यपुर्ण हाताळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या हस्ते प्रशंसापञ देत शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस कॉंस्टेबल विलास आंबेकर यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला कोल्हापुर परिक्षेञाचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक संदिप पाटील आदी उपस्थित होते.

गणेश वारुळे यांनी कोरेगाव भिमा दंगलीतही महत्वाची भुमिका बजावली होती. कोरेगाव भिमा अभिवादन शांततेत पार पडावा यासाठी शिक्रापूर पोलीसांनी या वर्षी विशेष खबरदारी घेतली होती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या