तळेगाव ढमढेरे येथे सुसज्ज क्रीडा संकुल होणार

Image may contain: 9 people, people smiling, people standingतळेगाव ढमढेरे,ता.४ फेब्रुवारी २०१९(प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगाव ढमढेरे येथे १५ एकर गायरान जागेत सुसज्ज क्रीडा संकुल होणार असून येत्या काही दिवसातच या संकुलाचे भूमिपूजन होणार आहे. या भव्य क्रीडा संकुला मुळे या ठिकाणी  राज्य व राष्ट्रीय स्तरावरीलही स्पर्धा घेता येतील असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.                       

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार पाचर्णे बोलत होते.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल आमदार पाचर्णे यांच्या हस्ते शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल शितोळे, सचिव मारुती कदम, शिक्षक परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला, शिरूर हवेली माध्यमिक शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, उपाध्यक्ष  प्रविण जगताप, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष  अशोक दरेकर, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब उदमले, प्रा. नागनाथ शिंगाडे, शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष अशोक भंडारे आदींचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील ज्ञानेश्वर शितोळे यांचा देखील आदर्श शिक्षक पुरस्काराने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच गुणवंत खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कोळीगीत, लावणी, नाटिका तसेच विविध मराठी व हिंदी सिने नृत्य सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी केले. रोहिणी नरके व ज्ञानेश्वर शितोळे यांनी सूत्रसंचालन केले तर  किरण झुरंगे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या