भाई...'एफडीए'वाले हमेशा देरसे क्यु आते है ?

Image may contain: 3 people, people standing and outdoorशिरुर,ता.५ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी मोठ्या शिताफीने ३१ लाख ४८ हजार ६६६ रुपये किंमतीचा गुटखा भरलेला ट्रक ताब्यात घेतला.माञ शनिवारी शिरुर पोलीसांनी एवढी मोठी कारवाई करुनही एफडीए च्या अधिका-यांनी सोमवारी पंचनामा करुन ट्रक ताब्यात घेतला.

सविस्तर माहिती अशी कि,शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांना  गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शिताफीने पाठलाग करुन संशयास्पद टेंपो शिरुर जवळील सतराकमान पुलाजवळ  ताब्यात घेतला असला असता टेंपो (एम.एच.१५ डिके ४८८७) मध्ये गुटख्याची पोती असल्याची आढळुन आली.त्यानंतर त्यांनी अन्न सुरक्षाविभागाला त्याबाबत कळविले.हि कारवाई शनिवारी करण्यात आली होती.

त्यानंतर उशिरा सोमवारी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी एम.डी.पाटील यांनी धाव घेउन टेंपो ताब्यात घेतला.या वेळी पंचनामा केला असता  ९ लाख २२ हजार पाचशे रुपये किंमतीच्या  रॉयले तंबाखुच्या १५० गोण्या,२२ लाख २६ हजार ६६६रुपये किंमतीच्या हिरा पान मसाल्याच्या २९५ गोण्या,आठ लाख रुपये किंमतीचा टेंपो असा मिळुन ३९ लाख ४९ हजार १६६ रुपये माल मिळुन आला. या मालाचा पंचानामा अन्न व औषध प्रशासन विभागाचे एम.डी.पाटील यांनी करुन ताब्यात घेतला.याविषयी अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी महेंद्र पाटील यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.निस्सार उस्मान खान(रा.देवगिरी कॉलनी,औरंगाबाद) यास ताब्यात घेतले आहे.

गुटख्याची चोरी-छुपे वाहतुक ?
गेल्या वर्षीही तत्कालीन शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे यांनी शिरुर-चौफुला रस्त्यावर करडे जवळ असाच गुटखा वाहतुक करणारा टेंपो ताब्यात घेतला होता.तेव्हांही अन्न व सुरक्षा विभागाला कळवुन उशिराच पंचनामा करण्यात आला होता.शिरुर पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्याची हि दुसरी वेळ असुन शिरुर व परिसरात अवैध वाहतुक होत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या