स्थानिक गुन्हे शाखेकडुन दोघांना शिरुरला अटक

Image may contain: 1 person, motorcycle and outdoorशिरुर,ता.६ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : मोबाईल कॉल करायचा असे सांगुन फसवुन मोबाईल चोरी करणा-या दोन ठकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली.

याबाबत पुणे ग्रामीण गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.23/12/2018 रोजी रात्री रांजनगाव एमआयडीसी हददीतील बेकार्ट कंपनी समोरुन कामाकरिता पायी जात असणा-या अमर बालाजी लगड यांना पल्सर बाइक वरुन तीन अनोळखी आरोपींनी येउन फिर्यादीस मोबाइल कॉल करण्यासाठी मागुन  घेऊन विश्वासघात करुन विवो मोबाइल20,000 रुपये किंमतीचा घेऊन गेले होते. त्यावरुन तीन अनोळखी आरोपींवर रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे प्रमाणे सोहेल शकील काझी(वय 21 वर्षे),सुरज शशीकांत चव्हाण (वय 21वर्षे दोघे रा.शिरुर ता.शिरुर)यांना  शिरूर जिजामाता उदयान येथून  सापळा लावून ताब्यात घेऊन तपास करता त्यानी वरील नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

या आरोपींना ताब्यात घेणेकामी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर,सहायक फौजदार गिरमकर,राजु मोमीन, पोपट गायकवाड यांनी कामगिरी केली.या आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना ताब्यात देण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या