स्वप्नील ढमढेरेची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

Image may contain: 3 people, people standingतळेगाव ढमढेरे,ता.६ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथील स्वप्नील बाळासाहेब ढमढेरे याची राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

पालघर येथे वरिष्ठ राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत स्वप्निल ढमढेरे याने ७२० पैकी  ६८० गुण मिळविले. या आधारे स्वप्निल ढमढेरे याची भुवनेश्वर (ओरिसा) येथे होणाऱ्या एकोणचाळीसाव्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त स्वप्निल सलग सातव्या वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे.

पालघरचे पालकमंत्री राजेंद्र गवते व आमदार अमित घोडे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या