तेरा विज्ञान प्रकल्पांची राज्यस्तरीयसाठी निवड

शिरूर,ता.७ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर येथील नुकत्याच झालेल्या विज्ञान प्रदर्शनातुन १३ प्रकल्पांची राज्यस्तरीय साठी निवड झाली आहे.

शिरुर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या झालेल्या या विज्ञान प्रदर्शनात जिल्ह्याच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांनी नावीन्यपुर्ण प्रकल्प सादर केले होते. यातील राज्यस्तरावर निवड झालेले प्रकल्प, कंसात प्रकल्प सादर करणारे विद्यार्थी; मार्गदर्शक शिक्षक व शाळेचे नाव गटनिहाय : इयत्ता सहावी ते आठवी : प्रथम- व्हील हेक्‍सा (रोहन राजाराम बर्डे, जवाहरलाल विद्यालय, केडगाव, ता. दौंड), द्वितीय- मेट्रो कार पार्किंग (राघव अतुल कुलकर्णी, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, पुणे), तृतीय- स्मार्ट टोल नाका (वंदना मारुती मेणे, ग्रामविकास विद्यालय, भांबुर्डे, ता. मुळशी). आदिवासी गट : सौर भात झोडणी यंत्र (नरेंद्र दिनकर कारभळ, न्यू इंग्लिश स्कूल, राजूर, ता. जुन्नर).

इयत्ता नववी ते बारावी (प्रथम)- चारचाकी वाहनांची चोरी रोखण्याचे यंत्र (शुभम गणेश सोनार, भालचंद्र विद्यालय, भांबोली, ता. खेड), द्वितीय- समुद्रातील पाण्याचे रूपांतरण (अद्वैत गौरव बुरांडे, शिवराज विद्यामंदिर, पुणे), तृतीय- घरगुती पाणी पंप (आदित्य महेश शिरसाठ, रामराव पलांडे माध्यमिक आश्रमशाळा, मुखई, ता. शिरूर). आदिवासी गट- पाणी बचत स्मार्ट कीट (अंकिता नितीन खंडागळे, आदर्श विद्यालय, अंबोली, ता. खेड).

लोकसंख्या प्राथमिक गट : स्त्री-पुरुष समानता (योगिता रामचंद्र शिंगाडे, जिल्हा परिषद शाळा, पाईट, ता. खेड). लोकसंख्या माध्यमिक गट- लोकसंख्या शिक्षण (महेंद्र दीक्षित, डी. ए. सातव हायस्कूल, बारामती). शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट- चौरस चेंडू बोर्ड (मुलाणी झुबेदा मेहमूद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जे. पी. नगर, इंदापूर). शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट- पेशींचे अंतरंग (अशोक बापूराव सोनवलकर, सनब्राईट माध्यमिक विद्यालय, आंबेगाव, ता. हवेली).

प्रयोगशाळा परिचर गटात भोर येथील आर. आर. विद्यालयातील शिक्षक केशव तुकाराम पवळे यांच्या "होपचे उपकरण' या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली. सुनीता राजू वामन (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुसूर, ता. जुन्नर) यांच्या "लेक वाचवा देश घडवा', मनीषा शशिकांत बारवकर (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोम्बर्डी, ता. भोर) यांच्या "बेटी बचाओ, बेटी पढाओ', दिलीप गंगाधर चौधरी (महात्मा गांधी विद्यालय, मंचर) यांच्या "कशाला हवे आणखी मेल', मनीषा श्रीरंग पवार (ज्ञानेश्‍वर विद्यालय, आळंदी, ता. खेड) यांच्या "लोकसंख्येचे दुष्परिणाम', दीपक शिवाजी रेटवडे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टाकळकरवाडी, ता. खेड) यांच्या "ग्रीटिंग टीचिंग', आर. एन. राघवन (ग्यानबा सोपानराव मोझे प्रशाला, पुणे) यांच्या "इलेक्‍ट्रॉनिक क्‍नॉफ्युगिरेशन', चंद्रकांत दादाभाऊ घाटगे (न्यू इंग्लिश स्कूल, कांदळी, ता. जुन्नर) यांच्या "सौर ऊर्जेवर हायड्रोजन वायूची निर्मिती व उपयोग' या प्रकल्पांनीही या विज्ञान प्रदर्शनात ठसा उमटवला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या