'मॅडम' सह 'त्या' साहेबांची ही चौकशी कराच...

Image may contain: 1 person, smiling, indoorटाकळी हाजी,ता.८ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) :  शिरूर तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनींचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण करत फसवणूक केल्याप्रकरणी नायब तहसीलदार गीतांजली गरड यांना पोलिसांनी गजाआड केल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असुन त्या महिला नायब तहसिलदारसह त्यात गुंतलेल्या मंडल अधिका-याचीही चौकशी झालीच पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की,जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील लिपिक चंद्रशेखर ढवळे यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने खोटे आदेश तयार केले. ते आदेश खोटे असल्याचे माहित असूनही ते खरे आहेत असे भासवण्यात आले.  सुभाष  नळकांडे याने त्याचा वापर केला. त्या आदेशावरून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे शिरुर तहसील कार्यालयातील पुनर्वसन लिपिक रमेश वाल्मिकी याने बनावट अर्ज तयार केले. त्यावर कारवाईचे अधिकार नसतानाही तत्कालीन रघुनाथ पोटे तहसीलदार यांच्या अपरोक्ष तत्कालीन नायब तहसीलदार गरड यांनी त्यांचे शेरे घेतले. पोटे यांच्या रजेच्या काळात अनेक वेळा तहसिलदार यांचा पदभार गरड यांच्या कडे होता.

शिरुर तालुक्यात शिक्रापूर, कासारी, कोरेगाव भिमा,कोंढापूरी, आपटी, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी, या परीसरात जमीनीला सोन्यांचा भाव आल्यामुळे, अनेक पुढारी, धनदांडगे यांचे लक्ष लागले आहे. त्यात अनेक गावातील जमिनी प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राखीव झाल्या आहेत. त्या लाभधारक जमीनी मिळणाऱ्या शेतकऱ्याला फसवुन, धमकावुन, नाहीतर महसुलला हाताशी धरून जमीनी लाटण्यांचा गोरख धंदा तालुक्यातील काही पुढाऱ्यांनी सुरू केला असुन, अश्या प्रकारे अनेक खोटे प्रकरणे तालुक्यात घडली. मात्र त्याला मसल पॉवरच्या जीवावर मिटविण्यात येत आहे.

सामान्य माणसांच्या साध्या ७, १२ व नोंदीसाठी  अनेक वेळा हेलपाटे मारायला लावणारे महसुलचे अधिकारी,मंडल अधिकारी  मात्र लक्ष्मी कृपेमुळे सामान्य लोकाच्या जमीनी धनदांडगे लोकांच्या घशात घालत आहेत. पूनर्वसनने या प्रकरणाबाबत तक्रार केली असल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले असले तरी, या सारखे अनेक वतनाच्या जमीनीच्या परवानगी देताना मोठया प्रमानात लक्ष्मी दर्शन घेऊन शेरे बदल्यांचे काम जिल्हा महसुलने केल्यांची चर्चा आहे. शिरूर तालुक्यातील अनेक वतनांच्या जमीनीचे व्यवहार खोटे मेडीकल प्रमाणपत्र देऊन मातीमोल भावात गरीब, अज्ञानी लोकांना हेरुन करण्यात आले असल्यांची चर्चा असुन, सन २०००ते आता पर्यंत ची चौकशी करण्यांची मागणी जनते मधुन होत आहे.

शिरूरला नायब तहसिलदार असताना गिंताजली गरूड यांची कारकीर्द वाळु व, जमीन माफीया यांच्याशी संबधांवरून चांगलीच गाजली होती, त्यासाठी  त्यांच्या रथाचा सारथी मदत करीत असल्यांची चर्चा तालुक्यात रंगली होती. तसेच त्यांना मदत करणारा क्लार्क नंतर टाकळी हाजी येथे मंडल अधिकारी झाला. तेथेही अनेक खोटया,नोंदी व नवीन शर्त जमीनी व्यवहार झाले असल्याची चर्चा ठिकठिकाणी रंगली असुन,यांचीही चौकशी होणार का? या कडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या