शिरुर महसुल खात्याला भ्रष्टाचाराची किड (वार्तापञ)

Image may contain: one or more people, phone and closeupशिरूर,ता.१२ फेब्रुवारी २०१९(मुकुंद ढोबळे) : शिरूर तालुक्यांत महसूल खात्याला भ्रष्टाचाराची कीड़ लागली असुन यातून या खात्याला कोणी थाबवणार का? शिरूर तालुक्यात महिला नायब तहसीलदार यांचा कोट्यावधी रुपयाचा जमीन घोटाळा उघडकिस आला आहे. शिरुर तालुक्यात लाचलुचपत विभागाने सर्वाधिक कारवाया या शिरुर महसुल खात्यात केल्या असुन त्यामुळे आता या खात्याला भ्रष्टाचारातून वाचवा अशी आर्त हाक देण्याची वेळ आली आहे.

शिरूर तालुक्यांत सर्वात महत्वाचे खाते असणारे महसूल खाते सध्या बदनाम होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गेल्या वर्षभरात या खात्यातील पाच सहा अधिकारी लाचलूचपत खात्याच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना घडल्या आहेत.यामुळे या खात्याची अब्रूच गेली आहे.

सध्या शिरूर तालुक्यातील जमिनीला सोन्याचा भाव आला असून जमिनीची खरेदी विक्री जोरात होत आहे.त्यात घरगुती वाटण्या, कूळकायदा,अनुसूचित जातीच्या शर्ती उठवणे,नोंदी करने,जागा बळकावणे या मुळे अनेक नागरिक अडचणीत येत आहे.याचा फायदा शिरूर तालुक्यातील तलाठी,मंडलाधिकारी उठवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सहा महीने अगोदर नुकतीच तालुक्याचे आमदार,प्रांत,तहसीलदार,याच्या समोरच झालेल्या बैठकीत नागरिकांनी गाव तलाठी,सर्कल पैसे घेतल्या शिवाय कामे करीत नसल्याचा आरोप केला होता.परंतु या कर्मचारी वर्गावर कोणाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.
      
परंतु यात अद्याप कुठला फरक झालेला दिसत नसल्यामुळे एका महिन्यात दोन कर्मचारी पून्हा जाळ्यात अडकले आहे.त्यामुळे याखात्यात भ्रष्टाचाराची मुळे अगोदरच खोलवर गेली आहे. त्यामुळे या खात्यात मोठया प्रमाणात असणारा पैसा यामुळे हे महसूल कर्मचारी चांगलेच सोकावले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.जिथे ज्याची जमीन तेथील जागेचा भाव सरकारी भाव सोडून खाजगी भावानूसार पैशाची खुले आम मागणी केली जाते.शिरूर तालुक्यांत एका सर्कल ला दोन वेळा लाचलूचपत खात्याकडुन पकडण्यात आले.यावरून या खात्यात भ्रष्टाचार किती खोल गेला आहे हे समजू शकेल.

शिरूर तालुक्यातील एका नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला कोट्यावधी जमीन घोटाळ्यात अटक केली असून यामध्ये या महसूल विभागातील एका लिपिक तलाठी सर्कल अशी अनेक जण अडकले असून मुळे शिरूर तालुक्यातील महसूल विभागाची पूरती अब्रू गेली आहे.राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार जर कोणत्या खात्यात होत असेल तर ते म्हणजे महसूल खात्यामध्ये होत आहे.वाळूमध्ये कोट्यावधीची माया महसूल खात्यातील तहसीलदार पासून तर तलाठी,सर्कल,लिपिका पर्यंत कमावलेली आहे.
 
जमीन घ्या किंवा विका याचा शेर ठरलेला आहे.सध्या या खात्याची अब्रू शिरूर तालुक्यांत गेली असून या खात्यातील भ्रष्टाचार करण्यापासून या महसूल कर्मचारी यांना आवरा हो अशी आर्त हाक देण्याची गरज निर्माण झाली असून,या खात्यात वरिष्ठ अधिकारी ते शेवटचा शिपाई सर्वच जण या साठी बदनाम असल्याचे भयानक चित्र पाहावयास मिळाले आहे.त्यामुळे या खात्याला लागलेली भ्रष्टाचार ची कीड़ नक्की कशी कमी होईल यांसाठी नवीन संशोधन करण्याची गरज आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या