चोरट्याने गाडीची काच फोडली अन् पळवले एक लाख

No photo description available.शिरुर, ता.१७ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : गाडीची काच फोडून गाडीच्या डिक्कीतील १ लाख १० हजार रुपये चोरटयाने चोरुन नेल्याची घटना शिरुर पंचायत समितीसमोरील आवारात घडली.

याबाबत विनोद तुकाराम वरखडे (रा.मुंबई बाजार,शिरुर) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,वरखडे यांचा कारेगाव येथे व्यवसाय आहे. शनिवार (दि.१६) रोजी फ्लॅट विकत घ्यायचा असल्याने त्यांनी घरातून ३ लाख २० हजार रुपये रक्कम घेउन ते स्वत:च्या फियाट कार मधुन घराबाहेर पडले.बॅंकेत काम आटोपुन महादेव नगर येथे फ्लॅट पहायला गेले.

त्यानंतर साई बिझनेस कोर्ट येथे जाउन २ लाख रुपये हे फ्लॅटचे अॅडव्हान्स म्हणुन दिले.तेथुन व वकिलाकडील काम उरकुन उरलेले १ लाख १० हजार रुपये रक्कम गाडीच्या पुढील डिक्कीत ठेवली व पंचायत समितीच्या मोकळ्या जागेत गाडी लावुन गेले होते.

यावेळी काम उरकुन आले असता,कारची दरवाजाची काच फोडली असल्याचे दिसले.यावेळी डिक्की उघडुन पाहिली असता त्यातील १ लाख १० हजार रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी शिरुर पोलीस स्टेशनला  धाव घेत अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या