...अन साखरपुड्यातच पार पडला विवाहसोहळा

Image may contain: 6 people, people standingवडगाव रासाई,ता.१९ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : नवरी पहायला आले..पाहुण्यांमध्ये अचानक चर्चा सुरु झाल्या अन काही वेळात कुठलाही थाटमाट न करता मोठ्या आनंदात लग्नसोहळा पार पाडला जातो.

वडगाव रासाई (ता.शिरुर) येथे नुकताच साधेपणाने साखरपुड्यातच लग्नसोहळा पार पडला. याबाबत सविस्तर असे कि, उन्नती बाळकृष्ण बरडे (मुळ रा.हातोला, जि.यवतमाळ सध्या रा.पाटीलमळा, वडगाव रासाई) ही वधु वडगाव रासाई येथे राहणारी तर सागर प्रभाकर इंगळे (रा.कारेगाव, ता.शिरुर) येथील वर. इंगळे कुटुंबिय हे वडगाव रासाई येथे लग्नाची बोलणी करायला आले होते.

यावेळी साखरपुडा करण्याचे नियोजन होते.परंतु ज्येष्ठ मंडळी अन मध्यस्थींच्या चर्चाअंती साखरपुडयातच विवाहसोहळा करण्याचे ठरले. यावेळी वधु अन वरांची संमती घेउन नियोजनही सुरु झाले.अवघ्या दोन तासांत विवाहाची तयारी पुर्ण करण्यात आली. काही वेळात कुठलाही बडेजाव न करता थाटमाट न करता अत्यंत साधेपणाने हा विवाह सोहळा पार पडला. हा अनोखा विवाहसोहळयास अनेक मान्यवरांसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस दुष्काळाची तीव्रता वाढत असताना अनेक लग्नसोहळ्यात होणारा खर्च हा डोळे दिपावणारा असतो. परंतु बरडे व इंगळे कुटुंबियांनी अत्यंत साधेपणाने साखरपुड्यातच विवाहसोहळा पार पाडल्याने समाजात नवा आदर्श घालुन दिला आहे. हा विवाह सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी कैलास शेलार, नितीन सावळे, सचिन सावळे, विलास डोंगरे,विलास वानखेडे, प्रविण इंगळे, सुरेश बरडे, आकाश चोटमल, मोहन सावळे, एकनाथ सावळे, बाळकृष्ण बरडे यांनी सहकार्य केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या