शिरुर तालुका येणार सौरउर्जेखाली...

Image may contain: 18 people, people smiling, people standingशिरूर,ता.२० फेब्रुवारी २०१९(मुकुंद ढोबळे) : पुणे जिल्ह्यातील सात पंचायत समिती व पन्नास ग्रामीण रुग्णालय येथे सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाताताई पवार यांनी दिली.

शिरूर पंचायत समिती येथे जिल्हापरिषद समाजकल्याण विभाग पुणे यांच्या वीस टक्के  निधीतून मागासवर्गीय समाजमंदिर मधे समाज प्रबोधन साहित्य व मागासवर्गीय वस्तीमध्ये दरीपंजा (चादर)वाटप करण्यात आले त्यावेळी सुजाताताई पवार बोलत होत्या.

यावेळी पंचायत समिती सभापती आबासाहेब कोहकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,गटविकास अधिकारी संदीप जठार,सरदवाडी चे सरपंच विलास कर्डिले,तर्डोबावाडी उपसरपंच तज्ञनिका कर्डिले, रामलिंग सरपंच दसगुडे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हापरिषद कृषी व पशुधन सभापती सुजाताताई पवार म्हणाल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर , दौंड , आंबेगाव , बारामती , दौंड , पुरंदर,  वेल्हा या सात तालूक्यामधे दहा मेगावॉट चा  सौर ऊर्जा प्रकल्प बसवणार असून त्यास मंजुरी मिळाली आहे.तर जिल्ह्यातील पन्नास प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन मेगावॉट चा सौरऊर्जा प्रकल्प बसवणार असून त्यात शिरूर तालुक्यातील चार प्राथमिक केंद्राचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.या सौरऊर्जा प्रकल्पामुळे शासनाला वीज बचत व विजेचा खर्च वाचणार असून सौर ऊर्जा प्रकल्पाचा पाच वर्षाचा देखभाल हा ठेकेदार कडे असणार असल्याचे त्यांनी सांगून पुणे जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे वतीने पुणे जिल्हयात दोनशे लिटर चे चारशे वॉटर हिटर वाटप केले असल्याचे पवार यांनी सांगितले.

समाजकल्याण समिती सभापती सूरेखाताई चौरे यांच्या समाज कल्याण विभागातर्फे शिरूर तालुक्यातील निर्वी,शिरसगाव काटा,कोळगाव डोळस,आंबळे तर्डोबाचिवाडी,गोलेगाव, चिंचणी,  शिरूर ग्रामीण,  सरदवाडी , अण्णापूर ,  या गावांमधील  मागासवर्गीय समाज मंदिरामध्ये तबला, पेटी इतर समाजप्रबोधन साहित्य वाटप करण्यात आले. वडगाव रासाई,शिरसगाव काटा, मांडवगण फराटा,तांदळी,तर्डोबाचीवाडी, आंबळे, न्हावरे या गावात दरीपंजा वाटप करण्यात आला असल्याचे सुजाताताई पवार यांनी सांगितले.जिल्हापरिषद इमारती मधे ही साठ मेगावॉट चा सौरऊर्जा प्रकल्प बसणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या