छञपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Image may contain: 1 person, on stage, standing and outdoor
शिरुर, ता.२० फेब्रुवारी २०१२९ (अभिजित आंबेकर) : महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज जयंती शिरुर शहर व परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वञ ढोल ताशांचा निनाद, दुचाकी व चारचाकी वाहनांना लावलेले भगवे झेंडे अशा भगव्यामय वातावरणात शिरुर शहर एकवटले होते.

मंगळवार (दि.१९) रोजी सकाळी शिरुर शहरात शिवसेवा मंदिराशेजारी श्री छञपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जयंती उत्सव समितीचे प्रमुख रविंद्र धनक,शिरुरचे तहसिलदार रणजित भोसले,पोलीस निरीक्षक कैलास घोडके,मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर,नगराध्यक्षा वैशाली वाखारे,मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष शोभना पाचंगे,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,नगरसेवक विनोद भालेराव,नगरसेविका सुनिता कुरंदळे,पुजा जाधव,आरपीआयचे तालुकाध्यक्ष निलेश जाधव,संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरेमामा,माधव सेनेचे रविंद्र सानप आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते.यानंतर सकाळी शिरुर शहरातुन मनस्विनी या महिला संघटनेच्यावतीने मिरवणुक काढण्यात आली.यामध्ये वैशाली गायकवाड,आदिती आढाव,आकांक्षा पडवळ यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शहरातील शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली होती.यात अनेक रिक्षा सामिल झाल्या होत्या.यावेळी राजेंद्र शेजवळ,रविंद्र मांढरे,चंद्रकांत घोडके हे उपस्थित होते.

शिरुरकर शिवप्रेमी ग्रुप तर्फे भव्य बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले.बुलेटवर भगवे झेंडे, भगवे फेटे परिधान करुन युवक स्वार झालेले पहावयास मिळत होते.श्री छञपती जयंती उत्सव समितीच्या वतीने छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्व.धनराज नहार स्मृती व्याख्यानमाला (दि.१५ ते १९)पाच दिवस साई गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती.हि व्याख्यानमाला आयोजित करण्याचे २२ वे वर्षे होते.शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती आवारातील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या वतीने भव्य फुलांची आरास तोरण,विद्युतरोषणाई करण्यात आली होती.

बाजारसमितीच्या वतीने सभापती शशिकांत दसगुडे यांनी पुष्पहार अर्पन करुन शिवाजी महाराजांना अभिवादन केले.यावेळी संचालक प्रविण चोरडिया,संचालिका छायाताई बेनके,सचिव अनिल ढोकले आदी उपस्थित होते.शिरुर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवरायांच्या प्रतिमेची सायंकाळी भव्य मिरवणुक काढण्यात आली.शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती आवारातील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन प्रतिमेची भव्य मिरवणुक काढण्यात आली.यावेळी हजारो शिवभक्त नागरिक उपस्थित होते.शुभम राजेंद्र कंक(सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वंशज) हे उपस्थित होते.हि संपुर्ण मिरवणुक शहरातील मुख्य बाजारपेठेतुन काढण्यात आली.या मिरवणुकीत झांज, ढोलपथक,बॅंड याचे आकर्षण दिसुन येत होते.या मिरवणुकिचे नियोजन कुणाल काळे, सचिन जाधव, भुषण खैरे, राकेश परदेशी, योगेश फाळके, अक्षय ढमढेरे, आलोक वारे, तुषार थोरात यांनी केले. शिरुर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता.

विठ्ठलवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
विठ्ठलवाडी येथे बाल शिवाजींची घोड्यावरून मिरवणूक काढून पांडुरंग विद्यालयाच्या बालचमूंनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे श्री पांडुरंग विद्यामंदिर मध्ये शिवजयंती उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून शालेय विद्यार्थ्यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त बाल शिवाजीची घोड्यावरुन ढोल, ताशा, झांज पथकाच्या सवाद्यामध्ये गावातून मिरवणूक काढली. यावेळी २५ मावळ्यांचा ताफा सहभागी झाला होता. मिरवणूक पांडुरंग मंदिराच्या सभागृहात येईपर्यंत ठिकठिकाणी महिलांनी बालशिवाजीचे औक्षवंत करून स्वागत केले. गावातील युवकांनी शिवज्योत वढु बुद्रुक येथून आणली होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवणावर पोवाडा, नृत्य व गीते सादर केली. बाल शिवाजी ची भूमिका सिद्धार्थ वाळके या विद्यार्थ्याने साकारली. यावेळी आयोजीत कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक संभाजी गवारे, तळेगाव ढमढेरेचे माजी सरपंच महेंद्र पवार, विठ्ठलवाडीच्या सरपंच ललिता गाडे, माजी सरपंच अलका राऊत, माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे, दिलीप गवारे, सोसायटीचे अध्यक्ष काळूराम गवारे, उपाध्यक्ष रायचंद शिंदे, विश्वनाथ गवारे संस्थेचे संचालक गणेश रायकर, मुख्याध्यापक सुरेश थोरात, विद्या सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महेंद्र पवार यांनी व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे संयोजन व नियोजन संगीता गवारे, भाऊसाहेब वाघ, प्रवीण जगताप यांनी केले. एस.एस.गवारे यांनी सूत्रसंचालन केले तर बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले.

गायकवाड विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

Image may contain: one or more people, people standing, people walking and outdoor
तळेगाव ढमढेरे: कासारी येथील सौ.हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त गावातून प्रभातफेरी काढून घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज व जिजाबाईंच्या वेशातील विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.  विद्यालयाच्या प्राणंगात शिवभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटीका, पोवाडे सादर केले तसेच मनोगते व्यक्त केली. यावेळी प्राचार्य अशोक सरोदे, राजाराम साबळे, रावसाहेब थोरात, अरुण भुजबळ, अर्चना टेमगिरे, ज्योत्स्ना दरेकर, शिवाजी पाखरे, पूनम ढमढेरे, विशाल सोनवणे, अर्चना शितोळे, दिलीप बांबळे, विजय पाचर्णे, प्रमिला मोहिते, शीतल धेंडे आदी उपस्थित होते. अर्चना टेमगिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या