उपशिक्षणाधिकारीपदी निवडीबद्दल आकाश दरेकरचा गौरव

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoor
सणसवाडी, ता.२१ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : सणसवाडी येथील आकाश दरेकरची राज्य सेवा परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तळेगाव ढमढेरे येथे त्याचा गौरव करण्यात आला.

शेतकरी कुटुंबातील आकाशने जिद्द, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळविले. तळेगाव ढमढेरे येथे मान्यवरांच्या हस्ते त्याचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, सचिव रोहन ढमढेरे, केंद्रीय वन अधिकारी धनंजय ढमढेरे, शिक्षक परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा. एन. बी. मुल्ला, उषा ढमढेरे, सचिन दरेकर, अनिकेत ढमढेरे, गणेश नरके, अभिजित ढमढेरे, सुरज भुजबळ, विकास रासकर, हिरामण ढमढेरे, सौरभ मेश्राम, अक्षय शिंदे, निहाल मुल्ला आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना धनंजय ढमढेरे यांनी युवकांना सांगितले की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एकाग्रता, जिद्द व  परिश्रम खूप महत्वाचे आहे. अपयशाने खचून न जाता यशाचा पाठलाग करण्याचे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले. ध्येय डोळ्यासमोर ठेऊन नियोजनबधरित्या अभ्यास केल्यास यशाला गवसणी घालता येते असे यावेळी बोलताना नवनियुक्त उपशिक्षणाधिकारी दरेकर यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या