शिरुरला वधु-वर परिचय मेळाव्यात ५०० वधु-वरांची नोंदणी

Image may contain: 8 people, people smiling, people standingशिरुर,ता.२२ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : शिरुर येथे संत रविदास महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.यावेळी आयोजित केलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यात ४०० ते ५०० वधु-वरांनी नोंदणी केल्याची महिती संत रविदास जयंती उत्सव समितीने दिली.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर संत रविदास महाराज व छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे,नगराध्यक्षा वैशाली वाखारे व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यानंतर वधु-वर परिचय मेळावा घेण्यात आला.यामध्ये सुमारे ४००-५०० वधु-वरांनी नांव नोंदणी केली.

या कार्यक्रमाला सिनेअभिनेते काळुराम ढोबळे,सिनेअभिनेञी तेशवानी वेताळ, संपादक एकनाथ अडसुळ, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष श्रीकांत सातपुते, चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, लेखक-ज्येष्ठ समिक्षक बाळासाहेब काकडे, लोकशाही क्रांती आघाडीचे रविंद्र धनक, मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष महबुब सय्यद, डॉ.गवारी, विजय पोटे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या