पित्याच्या स्मरणार्थ शहिद जवानांना ९२ हजार रुपये मदत

Image may contain: one or more people, cloud, sky and outdoorशिरुर,ता.२२ फेब्रुवारी २०१९(अभिजित आंबेकर) : काश्मिर येथील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील शहिद झालेल्या दोन जवानांना मुलांनी पित्याच्या स्मरणार्थ दशक्रिया विधीतच ९२ हजार रुपये रक्कम मदत म्हणुन देण्यात आली.

सविस्तर असे कि,दत्ताञय शेलार यांचे वडील आबु सखाराम शेलार यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले होते.त्यांचा दशक्रिया विधी बुधवार (दि.२०) रोजी बेलवंडी(ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर) येथे पार पडला.

यावेळी स्व.आबु शेलार यांचे चिरंजीव दत्ताञय शेलार यांनी वडिलांच्या स्मरणार्थ काश्मिर मधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन शहिद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणुन प्रत्येकी ४६ हजार रुपये असे मिळुन ९२ हजार रुपयांचा धनादेश श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्याकडे शेलार कुटुंबियांच्या वतीने सुपुर्द करण्यात आला.यावेळी अहमदनगर जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,राष्ट्रवादीचे पारनेर तालुक्याचे नेते निलेश लंके आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या