महिलांसाठीचे व्हॉलिबॉल प्रशिक्षण कौतुकास्पद: वाखारे

Image may contain: 9 people, people smiling, people standing and outdoorशिरूर,ता.२३ फेब्रुवारी २०१९(मुकुंद ढोबळे) : ग्रामीण भागातील महिलांना हॉलीबॉल खेळामध्ये राज्य व देशपातळीवर आपले नाव उंचावण्यासाठी शिरूर शहरात सुरू करण्यात आलेले व्हॉलीबॉल प्रशिक्षण कौतुकास्पद असल्याचे शिरूर च्या नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी सांगून महिलांनी या खेळामध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.

शिरूर सेंटर शाळा मैदान येथे संस्था यांच्या वतीने शाळा, कॉलेज तरुणी व महिलांसाठी हॉलीबॉल प्रशिक्षण सुरू केले याचे उद्घाटन नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते झाले.त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी घोडगंगा चे संचालक राजेंद्र गावडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, नगरसेविका मनीषा कालेवार, उज्वला वारे, रोहिणी बनकर,ज्योती लोखंडे,कल्पतरू फौंडेशन च्या अध्यक्षा डॉ.स्मिता कवाद, डॉ.विजय कवाद, रमेश लामखडे, जयश्री जासूद, संगीता शिंदे, रुपाली लामखडे, डॉ. नूतन क्षीरसागर, गणेश मराठे उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या