सायकली मिळालेल्या पाहुन हरखुन गेल्या मुली

Image may contain: 9 people, people smilingकान्हुर मेसाई,ता.२३ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) : सायकली  मिळालेल्या पाहुन कान्हुरमेसाई येथील विद्याधाम च्या विद्यार्थिनी हरखुन गेल्या.

पुणे येथील द संडे क्लबच्या वतीने १९ सायकलींचे वाटप करण्यात आले.द संडे क्लब हा पुणे येथील ३२ जणांचा ग्रुप असुन सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.या नव्या को-या सायकली मिळाल्याचे पाहुन विद्यालयातील मुली हरखुन गेल्या होत्या.या सायकलींच्या वाटप प्रसंगी द संडे क्लबचे अध्यक्ष बापुसाहेब कुलकर्णी,गणेश मापारी, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर पुंडे,उपाध्यक्ष तान्हाजी खर्डे,पी.एस.पुंडे,प्राचार्य मच्छिंद्र माने,पर्यवेक्षक खोडदे,प्रा.शिंदे आदी उपस्थित होते.

कान्हुर मेसाई सारख्या दुर्गम भागात द संडे क्लबने सामाजिक भान जपत विद्यार्थिनींना सायकल  वाटप केल्याने संस्थेचे अध्यक्ष भास्कर पुंडे व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानन्यात आले.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या