शिरूर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ५ हजार ५८१ विद्यार्थी

शिरुर, ता.२५ फेब्रुवारी २०१९ (प्रतिनीधी) :  शिरूर तालुक्यात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ५  हजार ५८१ विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची व या परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती  गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी दिली.

रविवार(दि.२४ फेब्रुवारी) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात   पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा( इयत्ता आठवी) पार पडली. शिरूर तालुक्यात पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३ हजार ६९६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. या विद्यार्थ्यांनी शिरूर तालुक्यातील एकूण २२ केंद्रांवर परीक्षा दिली.  तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १ हजार ८८५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या विद्यार्थ्यांनी शिरूर तालुक्यातील एकूण १० केंद्रावर शिष्यवृत्तीची परीक्षा दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या