शिरुरला माजी सैनिकांनी केला आंदोत्सव साजरा (Video)

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoorशिरुर,ता.२७ फेब्रुवारी २०१९(प्रतिनीधी) : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये घुसुन केलेल्या कारवाई चे स्वागत शिरूर तालुक्यातील आजी-माजी सैनिकांनी श्री गणेशा हॉस्पिटल येथे एकत्र येऊन फटाके फोडून व मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला.तर शिरुरकरांनी पेढे वाटुन स्वागत केले.

यावेळी शिरूर तालुक्यातील सुमारे ५०-६० आजी माजी सैनिक उपस्थित होते.यावेळी माजी सैनिकांनी दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरएफ जवानांना श्रद्धांजली वाहिली. श्री गणेशा हॉस्पिटल चे संचालक डॉ.अखिलेश राजूरकर सर, डॉ.विशाल महाजन, डॉ.सौरभ पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी शिरूर शहरातील नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर, हॉस्पिटल चे डॉक्टर व स्टाफ आवर्जून उपस्थित होता.

भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल शिरुरकरानी फटाके फोडून व पेढे वाटुन स्वागत केले व दहशतवाद्याना धडा शिकविल्याबद्दल  भारतीय सैन्याचे अभिनंदन केले.

भारतीय सैनिकानी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ल्या केल्याचे वृत्त शहरात समजताच सकाळी शहरातील विविध संस्था संघटनेच्या कार्यकर्ते आस्वाद हॉटेल जवळ जमा झाले.भारतीय ध्वज त्यांच्या हातात होता. भारत माता कि जय चा जयघोष करित त्यांनी भारतीय सैनिकांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईक चे अभिनंदन करत फटाके वाजविले त्याच बरोबर पेढे ही वाटले. यावेळी नगरसेवक मंगेश खांडरे, भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे,मनसेचे जिल्हा उपप्रमुख महिबूब सय्यद, शिरुर मुद्रण संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, शिवसेनेचे मयुर थोरात, सुनिल परदेशी, नामदेवराव घावटे,माजी उपसरपंच संजय शिंदे, मुश्ताक शेख, विजय नरके, अशोक काळे ,रणजित गायकवाड, निलेश नवले, कांतीलाल सेवक, मितेश गादिया, ओकांर ससाणे, अशोक शेळके, प्रदिप चोपडा आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या